महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरपण फुंकून स्वयंपाक करताना... - LPG Cooking Gas

आजच्या आधुनिक भारतात आजही अनेक कुटुंबांना चूल फुंकल्याशिवाय अन्न मिळत नाही. मात्र, चुलीचा वापर, एलपीजी गॅसचा वापर आणि स्वयंपाक बनवण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह असणे या बाबतींत दाक्षिणात्य राज्यांतील स्थिती तुलनेने चांगली आहे.

चूल
चूल

By

Published : Dec 5, 2019, 3:21 PM IST

चूल फुंकल्याशिवाय अन्न मिळत नाही. आजच्या आधुनिक भारतात आजही अनेक कुटुंबांची हीच अवस्था आहे. सध्याच्या परिस्थितीत, जेथे आम्ही विकासाच्या आघाडीवर असल्याचा दावा करत आहोत.


एका राज्यातील १२.७ टक्के कुटुंबांमध्ये आजही चुलीवर स्वयंपाक करण्यात येतो. ताज्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालात ग्रामीण गावांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे असल्याचे उघड झाले असून १८.४ टक्के ग्रामीण भागांतील घरांपर्यंत पोहचून ही माहिती मिळवली आहे.


सरपणाचा वापर स्वयंपाक करण्यासाठी करणाऱ्या कुटुंबांची देशभरातील संख्या ३१.२ टक्के आहे. एका तयार अनुमानाच्या सांख्यिकी आकडेवारीनुसार त्यामध्ये आंध्रप्रदेश १२.७ टक्के, तेलंगणा ४.९ टक्के, कर्नाटक १६.२ टक्के, तामिळनाडू ८.४ टक्के अशी राज्यनिहाय आकडेवारी आहे. देशभराचा विचार करता येथील कमी लोकांकडून अन्न शिजवण्यासाठी चुलीचा वापर केला जातो.


सांख्यिकी आकडेवारीनुसार आंध्रप्रदेश ८१.३ टक्के, तेलंगणा ९०.७ टक्के, कर्नाटक ८१.४ टक्के, तामिळनाडू ८६.७ टक्के असा राज्यनिहाय स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर केला जातो. देशभरात या राज्यांमधील स्थिती चांगली दिसत आहे. देशात सर्वाधिक कुटुंबात एलपीजीचा वापर स्वयंपाकासाठी होत असून याबाबतीत देशामध्ये तेलंगण सर्वोच्च स्थानी आहे. राष्ट्रात, ६१.४ टक्के परिवार एलपीजीचा उपयोग स्वयंपाकासाठी करत आहेत.

स्वयंपाकासाठी गरजेची कोणतीही तरतूद नसलेली आणि भटके आयुष्य जगणारी कुटुंबे

  • आंध्रप्रदेशातील शहरी भाग -११.९ टक्के
  • तेलंगणाचे शहरी भाग -७.७ टक्के

ज्या कुटुंबांना स्वयंपाक शिजवण्यासाठी योग्य सुविधा आहेत. त्यांची संख्या आंध्रप्रदेश ६७.५ टक्के, तेलंगण ६३.९ टक्के, कर्नाटक ७९.३ टक्के, तामिळनाडू ७६ टक्के ऐवढी आहे. याचबरोबर देशात एकंदरीत, ६०.२ टक्के कुटुंबांना अजूनही स्वतंत्र स्वयंपाकगृहे नाहीत.


केरळमध्ये...
केरळ राज्यामध्ये, अजूनही ३७.८ टक्के कुटुंबांमध्ये सरपणावर स्वयंपाक करण्यात येतो. तरीसुद्धा, ९६ टक्के कुटुंबांना स्वयंपाक शिजवण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृहे आहेत. यातील सर्वोत्कृष्ट भाग असा की, ही बहुतेक सारी कुटुंबे गावांमध्ये आणि ग्रामीण भागात आढळतात. तरीही, अनेक भागात आपल्याला अनेक कुटुंबे घरगुती स्वयंपाकासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांचा उपयोग करताना दिसतात.

ABOUT THE AUTHOR

...view details