महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींचे समर्थक आपचे मतदार... - केजरीवाल

विधानसभा मतदारसंघ निहाय, भाजपला दिल्लीच्या ७० पैकी ६५ जागांवर आघाडी होती. तर काँग्रेसला ५ आणि आपला शून्य आघाडी होती. भाजपला आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असला पाहिजे. पण आपच्या गोटातून आत्मविश्वास बाहेर पडत आहे. काँग्रेस या लढाईत कुठेच नाही.

मोदींचे समर्थक आपचे मतदार...
मोदींचे समर्थक आपचे मतदार...

By

Published : Jan 11, 2020, 10:25 PM IST

येत्या काही दिवसात लोकांचा कल बदलला नाही तर दिल्लीत आपची बाजू वरचढ ठरणार आहे. २०१९ च्या मध्याला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दिल्लीत भाजपला ५७ टक्के मते मिळाली आणि ७ लोकसभा जागा जिंकल्या. फक्त १८ टक्के मतांसह आप ५ जागा घेऊन तिसऱया स्थानावर राहिला.

विधानसभा मतदारसंघ निहाय, भाजपला दिल्लीच्या ७० पैकी ६५ जागांवर आघाडी होती. तर काँग्रेसला ५ आणि आपला शून्य आघाडी होती. भाजपला आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असला पाहिजे. पण आपच्या गोटातून आत्मविश्वास बाहेर पडत आहे. काँग्रेस या लढाईत कुठेच नाही.

लोकभावनेत इतका विरोधी बदल होण्यामागील एक मोठा घटक आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे २०१९ मध्ये झालेल्या आपल्या चुकांपासून धडा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत,

हे आहे. मोदी फॉर पीएम अँड केजरीवाल फॉर

  • सीएम या विरोधाभासी तरीही लोकप्रिय भावनांतील सत्य प्रथम केजरीवाल यांनी मान्य केले. त्याच्या परिणामी, केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ले चढवणे बंद केले. शिक्षणात अर्थसंकल्पात अभूतपूर्व म्हणजे ३५ टक्के तरतूद करून, आप सरकारने आनंदी निर्देशांक आणि व्यावसायिकता असे विषय लागू केले असून शिक्षकांचे प्रशिक्षण नव्याने केले.
  • आरोग्य आघाडीवर, आपच्या मोहल्ला दवाखान्यांची कल्पना प्रचंड आवडली आहे. एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात १२ हजार लोकसंख्येला ते सेवा पुरवतात. ४०० मोहल्ला क्लिनिक सध्या सुरू आहेत.
  • दिल्ली महिलांसाठी असुरक्षित शहर समजले जात असल्याने, आप सरकारने महिला प्रवाशांसाठी गुलाबी पासची कल्पना राबवली असून त्या डीटीसीच्या सुरक्षा रक्षक असलेल्या बसमधून मोफत प्रवास करू शकतात. पाणी-बिल अर्ध्यावर आणून आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा केल्याने आम आदमी आपकडे आकर्षित झाला आहे.


अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा हा ही घटक आपसाठी अनुकूल आहे आपचे अनेक संस्थापक सदस्य सोडून गेले असले तरीही केजरीवाल यांची प्रतिमा तशीच आहे.
भाजपला हिंदुत्ववादी ध्रुविकरणाची संधी मिळू नये, म्हणून आपने सावधपणे स्वतःला मुस्लिम तुष्टीकरणापासून दूर ठेवले आहे. फक्त हिंदू ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा प्रायोजित करण्याच्या योजना सुरू केल्या आहेत. यमुना नदी स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांना धार्मिक डूब दिली आहे.

भाजप आणि काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. गटबाजी ही भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी सामायिक आहे. मोदी सरकारच्या बाजूने १७३१ अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क प्रदान करण्याचा घेतलेला निर्णय हाच एक सकारात्मक मुद्दा आहे. मुस्लिम मते ही आपच्या मागे आहेत आणि एक टक्का ख्रिश्चनांची मतेही आपकडेच आहेत. शिख मात्र मोठ्या प्रमाणावर शिरोमणी अकाली दलाचा मित्रपक्ष म्हणून भाजपला अनुकूल आहेत.

दोन विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी

पक्ष २०१३ २०१५

आप २९.५ टक्के मते २८ जागा ५४.३ टक्के ६७ जागा

भाजप ३३.१ टक्के ३२ जागा ३२.३टक्के ३ जागा3

काँग्रेस २४.६ टक्के १६ जागा ९.७ टक्के ० जागा



सांख्यिकी

  • एकूण लोकसंख्या १ कोटी ५० लाख
  • एकूण मतदार १ कोटी ४३ लाख
  • पुरूष मतदार ७९ लाख
  • महिला मतदार ६४ लाख


    आपः पार्टी विथ द डिफरन्स


    अटल अडवाणी यांच्या युगात, भाजप पार्टी विथ द डिफरन्स असा दावा करत असे. आता दिल्लीत आपने ही उपाधी मिळवली आहे. भाजप आणि काँग्रेस दिल्लीकडे भारताचे आणखी एक राज्य म्हणून पाहत आले. त्यांचे राजकारण जात आणि धर्माची गणिते आणि सवलतींमध्येच अडकले होते. पण दिल्ली आप निवडणुकीच्या मैदानात २०१३ मध्ये उतरल्यापासून दिल्ली खूप बदलली आहे. आपने दिल्लीला नव्या कल्पनांची परिक्षा करण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून वापरले आहे.

    जाती आणि धर्मावर निवडणूक जिंकण्यासाठी आप कधीच अवलंबून राहिला नाही. भारतीय राजकारणातील सर्व वांशिक ओळख, वर्ग, जात, धर्म, महिला सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास या सर्वांचा छेदनबिंदू म्हणून दिल्लीकडे आपने पाहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details