पाटणा - बिहारमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले होते. पटनासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. महापूरानंतर प्रचंड जीवित आणि वित्तहानी राज्यात झाली. बिहार उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह ८ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बिहार महापूर: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात उच्च न्यायालयात तक्रार दाखल
बिहार उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह ८ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बिहार महापूर
बिहार उच्च न्यायालयाचे वकिल राम संदेश राय यांनी संबधीत तक्रार दाखल केली आहे. पटना ९ दिवस पाण्यात बुडाल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर शुक्रवारी सीजेएम न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी बिहारमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला होता. शहरामध्ये सगळीकडे पाणी तुंबले होते. घरे, शाळा, कार्यालये तसेच रुग्णालयांमध्येदेखील पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. या पुरात ४० लोक दगावल्याची माहिती आहे.