कोलकत्ता (प.बं)- कोलकत्ता येथील एका अभिनेत्रीला बलात्काराची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्री १९ मार्च रोजी मुंबईहून कोलकत्त्याला आली होती. त्यानंतर ही अभिनेत्री रजत हाट येथील तिच्या मित्राच्या फ्लॅटवर विलगीकरण अवस्थेत होती. पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही तक्रार नोंदवली नसल्याची ग्वाही या अभिनेत्रीने दिली आहे.
मी एक जबाबदार नागरिक आहे. मी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीचे आदर करते. २९ मार्च रोजी १० दिवसांच्या विलगीकरणानंतर माझ्या वडिलांनी मला आमच्या घरी नेले होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. माझ्या अवस्थेबद्दल मी पोलिसांना सांगितले. मला कुठलाही शारीरिक त्रास नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर पोलिसांनी मला बाहेर जाऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत सापडाल असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर काही समाजकंटकांनी माझ्या घरावर विटीने हल्ला केला. मला शिवीगाळ केली, असे पीडित अभिनेत्रीने सांगितले.