नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे माजी नेते व राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात कायदा आपले काम करेल आणि पनामा पेपर्स प्रकरणी न्याय होईल. जर पाकिस्तानचे पंतप्रधान कारागृहात जात असतील तर भारतात या प्रकरणात ज्यांचे नाव आले, त्यांनाही शिक्षा होऊ शकते.
पनामा पेपर्स प्रकरण : अमिताभ बच्चन यांनाही होऊ शकते शिक्षा; अमरसिंह यांचे संकेत - amitabh bacchan
पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव आले होते. यावरुन अमरसिंह यांचा इशारा हा अमिताभ यांच्याकडे होती. अमिताभ यांना या प्रकरणी शिक्षा होईल असे संकेत त्यांनी दिले.
पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव आले होते. यावरुन अमरसिंह यांचा इशारा हा त्यांच्याकडे असल्याचे संकेत त्यांनी दिले. ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमर सिंह म्हणाले, अमिताभ बच्चन राजकारणात आले होते, तेव्हा त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा सारख्या प्रतिष्ठीत नेत्यांचा पराभव केला होता. तरीही त्यांनी राजकारण सोडले.
अमरसिंह म्हणाले, त्यांनी असे का केले, हे सांगता येणार नाही. पण आपणाला हे लक्षात घ्यावे लागेल की चित्रपट करत असताना अभिनेत्यासोबत एक मदतणीस असतो जो अभिनेत्याचा घामही पूसतो. पण राजकारणात असे होत नाही. येथे तुम्हाला स्वत:ची जागा तयार करावी लागते. श्रीमंत-गरीब या सर्वांना भेटावे लागते.