चंदीगड (पंजाब) - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रेल्वे मंत्रालयाने राज्यातील मालगाड्या बंद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. मालगाड्या न चालवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कॅप्टन यांनी नड्डा यांना याबाबत सामूहिक इच्छाशक्ती दाखवण्याचे आवाहन केले.
मालगाड्या बंद केल्याचे गंभीर परिणाम देशात होऊ शकतात. यामुळे केवळ पंजाबच नव्हे तर लडाख आणि काश्मीरमधील सशस्त्र दलांसह संपूर्ण देशासाठी धोकादायक परिणाम होऊ शकतात. राजकीय संघर्ष किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, असे कॅप्टन म्हणाले.