ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले हवाई सर्वेक्षण.
'अम्फान'चा कहर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
20:25 May 21
17:13 May 21
महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची एक टीम राज्यांची भेट घेईल. पश्चिम बंगालमध्ये मृत्यू आणि जखमींची संख्या वाढू शकते - एनएस प्रधान (प्रमुख, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक)
17:09 May 21
- मृतांच्या वारसांना अडीच लाखांची मदत देणार - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
- अशी आपत्ती याआधी कधीच पाहिली नाही
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथील परिस्थिती बघण्यासाठी राज्याचा दौरा करायला सांगणार - ममता बॅनर्जी
15:44 May 21
मृतांचा आकडा 72 वर - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
अम्फान महाचक्रीवादळाने मृत्यू झालेल्यांची संख्या 72 वर पोहोचली आहे. यात पूर्वी मेदिनीपुरमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक गंभीर झाल्याची माहिती आहे. बुधवारी आलेल्या या महाचक्रीवादळानंतर पूर्वी मेदिनीपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महाचक्रीवादळामुळे जवळपास 100 कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे.
15:32 May 21
महाचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत संवाद साधला. तसेच सध्याच्या परिस्थितीत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
15:26 May 21
महाचक्रीवादळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा -
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय बचाव पथक कार्यरत आहेत. मी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या लोकांना घरात राहून सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना.
15:17 May 21
महाचक्रीवादळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी -
चक्रीवादळग्रस्त भागांमध्ये राष्ट्रीय बचाव पथक कार्यरत आहे. पीडितांना मदत करण्यात सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. आम्ही पश्चिम बंगालमधील दृश्य पहात आहोत. सध्याची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण देश पश्चिम बंगालसोबत आहे.
13:05 May 21
राष्ट्रीय बचाव पथकाचे प्रमुख एसएन प्रधान म्हणाले, महाचक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या रस्त्यांवरून झाडे बाजूला करण्याची कामे वेगात सुरू आहेत. तसेच काही भाग पूर्णपणे मोकळे झाले आहेत. काही भागांमध्ये खंडित झालेली वीज आणि दूरध्वनीसेवा पूर्ववत करण्यास थोडावेळ लागू शकतो, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली. मात्र, ज्याठिकाणी मदतीची आवश्यकता आहे त्याठिकाणी आम्ही मदत करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
11:55 May 21
पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधील रामनगर पंचायत येथे बनविण्यात आलेल्या 'मल्टिपर्पज सायक्लोन शेल्टर' येथे नागरिक आश्रय घेत आहेत. याठिकाणी त्यांच्या जेवणाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
11:54 May 21
ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील परिस्थिती
11:31 May 21
महावादळामुळे पश्चिमबंगाल झालेली अवस्था.
10:53 May 21
महाचक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळाची झालेली अवस्था...
10:33 May 21
- अम्फाननंतरच्या परिस्थितीची दखल घेण्यासाठी कटकचे जिल्हाधिकारी भबानी शंकर चैन्ये यांनी जिल्ह्यातील अनेक भागांचा दौरा केला.
10:05 May 21
- महाचक्रीवादळ मागील सहा तासांत ताशी 27 किमी वेगाने उत्तर ईशान्य दिशेने सरकले...
09:31 May 21
महाचक्रीवादळातील मृतांच्या वारसांना अडीच लाखांची मदत - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
कोलकाता (पश्चिम बंगाल) - अम्फान महाचक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या महाचक्रीवादळात मृतांच्या वारसांना अडीच लाखांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये आणि ओडिशामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत या महाचक्रीवादळामुळे कोलकाता आणि शहरातील काही भागांतील घरे अक्षरश: उद्ध्वस्त केले आहेत. तसेच अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यात पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत एकूण 72 जणांचा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
तर उत्तर परगणा जिल्ह्यात झाडे कोसळत असताना एक व्यक्ति आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच हावडाजवळ एका 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले, विद्युतदाबामुळे हुगळी आणि उत्तर परगणा जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
सुपर सायक्लोनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओडीशामध्ये 3 महिन्याचे नवजात शिशू आणि पश्चिम बंगालमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त बांग्लादेशमध्येही सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यासंपूर्ण प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.