केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 500 कोटींची मदत जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
'अम्फान' LIVE : केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 500 कोटींची मदत जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - अम्फान महाचक्रीवादळ लाईव्ह
18:10 May 22
15:31 May 22
- भुवनेश्वर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि राज्यपाल गणेशी लाल यांनी केले स्वागत.
13:16 May 22
केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची मदत. सरकार पश्चिम बंगाल सोबत - पंतप्रधान मोदी
13:13 May 22
- ममतांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालने चांगले प्रयत्न केले - पंतप्रधान
13:13 May 22
राज्यातील बशीरहाट येथे झाली बैठक
- मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत - पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
12:47 May 22
हवाई सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत समीक्षा बैठक सुरू. राज्यापालही बैठकीला उपस्थित.
12:43 May 22
पंतप्रधान मोदींनी हवाई पाहणी केली. सोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही.
12:35 May 22
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ममतांनी मानले आभार.
11:36 May 22
- पश्चिम बंगालमधील 60 टक्के भाग महाचक्रीवादळाने प्रभावित झाला आहे. तर आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
11:36 May 22
- हवाई सर्वेक्षणादरम्यान पंतप्रधानांसोबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, बाबुल सुप्रियो, प्रताप चंद्र सारंगी आणि देबाश्री चौधरी सोबत असल्याची माहिती.
09:46 May 22
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता विमाळतळावर पोहोचले. विमानतळावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर.
09:30 May 22
ममतांच्या नेतृत्वात पश्चिमबंगालने चांगले प्रयत्न केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात विमानतळावर पोहोचले आहेत. त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. 'अम्फान' या महाचक्रीवादळाने झालेल्या भयंकर नुकसानीचा ते आढावा घेणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, अशी आपत्ती मी याआधी कधीच पाहिली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना येथील परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यास सांगणार आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळामुळे 72 लोकांचा मुत्यू झाला असून 1 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. तसेच ओडिशामधील किनारपट्टी लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये टेलिकॉम पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी अम्फानमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना अडीच लाखांची मदत जाहीर केली आहे.