कोलकाता - बुधवारी अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडक दिली. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. हावडा येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे एका शाळेचे छत उडून गेले. बुद्धभूषण विद्यालयाच्या भव्य इमारतीचे छत एखाद्या पत्त्याच्या घराप्रमाणे वाऱ्यावर उडाले.
अम्फान चक्रीवादळाच्या तडाख्याने शाळेचे गेले छत उडून - हावडा शाळा न्यूज
अम्फान चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. हावडा येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे एका शाळेचे छत उडून गेले. बुद्धभूषण विद्यालयाच्या भव्य इमारतीचे छत एखाद्या पत्त्याच्या घराप्रमाणे वाऱ्यावर उडाले.
शाळा
अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या असून कोलकाता विमानतळ सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या वादळामुळेच ओडिशातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, अंदमान निकोबार, आसाम आणि मेघालय या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता.