कोलकाता -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता स्थापन करेल, असा दावा भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज केला. ते पश्चिम बंगालमधील मिदीनापूर येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ही तर सुरूवात आहे -
आत्ता तर ही सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसमध्ये एकट्याच राहतील, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या उपस्थितीत तृणमूलची मोठे नेते सुवेंदु अधिकारी यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. आमदार शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
खऱ्या अर्थाने सोनार बांगला करू -
डाव्या पक्षांना पश्चिम बंगालने 27 वर्षे संधी दिली. तर तृणमूल काँग्रेसला दहा वर्ष संधी दिली. भाजपाला पाच वर्षे संधी द्या, पश्चिम बंगालला खऱ्या अर्थाने सोन्याचा बांगला केल्या शिवाय राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.