नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज राज्यसभेमध्ये बोलणार आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचा अहवाल ते सादर करतील. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर, बहुमत मिळालेल्या पक्षांमधील युती तुटल्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
- १२ नोव्हेंबर २०१९ ला राज्यघटनेच्या महाराष्ट्र राज्य संबंधी कलम ३५६, परिच्छेद (३) नुसार राष्ट्रपतींनी केलेली उद्घोषणा (जी. एस. आर. नंबर ८३७ (ई)).
- १२ नोव्हेंबर २०१९ला उपरोक्त उद्घोषणेच्या कलम (सी), पोटकलम (१) अंतर्गत राष्ट्रपतींनी दिलेला आदेश.
- १२ नोव्हेंबर २०१९ला उद्घोषणेबाबत महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिलेला अहवाल.