महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीर विधेयक संसदेत मांडताना मनात भीती होती, अमित शाह यांनी केला खुलासा - काश्मीर विधेयक

जम्मू-काश्मीर राज्याला विषेश दर्जा देणारे कलम ३७० कलम फार पुर्वीच रद्द करायला हवे होते - अमित शाह

अमित शाह

By

Published : Aug 11, 2019, 2:59 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर राज्याला विषेश दर्जा देणारे कलम ३७० कलम फार पुर्वीच रद्द करायला हवे होते. ३७० कलम रद्द केल्यानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल माझ्या मनामध्ये किंचतही गोंधळ नाही. आता काश्मीरमधील दहशतवाद संपेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने पुढे जाईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच राज्यसभेमध्ये बहुमत नसल्याने मनामध्ये भीती होती, असेही ते म्हणाले.

काश्मीरचे विभाजन केंद्रशासित प्रदेशामध्ये केल्यानंतर गृहमंत्री अमित शाहांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर विधेयक संसदेत मांडताना माझ्या मनात शंका होती. कारण राज्यसभेमध्ये आम्हाला बहुमत नव्हते, तरीही विधेयक सर्वप्रथम राज्यसभेतच मांडले. मात्र, राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळली. मतदान होऊन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून सरकारवर टीका होत आहे. जम्मू काश्मीर राज्यातही स्थिती तणावपूर्ण असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, गृह मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. संचारबंदी अजूनही लागू असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जम्मूमधील काही भागामधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. ईदच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details