नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (सोमवार) जम्मू-काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक सादर करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलेल्या १० टक्के आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाच्या ठिकाणी हे विधेयक जागा घेणार आहे.
जम्मू-काश्मीर आरक्षणासंदर्भातील पहिले विधेयक अमित शाह आज संसदेत सादर करणार - राष्ट्रपती
अमित शाह जम्मू-काश्मीर संदर्भातील आरक्षण विधेयक संसदेत सादर करणार आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यात जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळालेली आहे.
संसद
संसदेतील दोन्ही सभागृह लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषण प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. यानंतर, अमित शाह जम्मू-काश्मीर संदर्भातील आरक्षण विधेयक संसदेत सादर करणार आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यात जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळालेली आहे. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर काश्मीरच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे.