पानिपत -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. घुसखोर तुमचे मावस भाऊ आहेत का? असा सवाल करत कलम ३७० वरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली. हरियाणामधील पानिपत येथे प्रचार सभेला ते संबोधीत करत होते.
'काँग्रेसला घुसखोरांचा पुळका', अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल - घुसखोर काँग्रेसचे मावस भाऊ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

जेव्हा भाजप घुसखोरांना देशाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा त्यांना का बाहेर काढल जातयं? ते कुठे जातील? काय खातील? असे काँग्रेस म्हणते. यावरून मी काँग्रेसला विचारू इच्छितो की, घुसखोर तुमचे मावस भाऊ लागतात का? जर काँग्रेसचे कलम ३७० वरील मत स्पष्ट आहे. तर पुन्हा कलम ३७० लागू करू, असे त्यांनी म्हणायला हवे, असा टोला शाह यांनी लगावला.
काँग्रेस तीन सिद्धांतावर मार्गक्रमण करत आहे. दरबाऱयांची सरकार, जावयाची सरकार, आणि जावयाच्या दलालाची सरकार, या तीन सिद्धांतावर काँग्रेस चालत असल्याचं शाह म्हणाले.