अहमदाबाद - ओडिशाच्या तीर्थ नगरी पुरीत भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.भगवान जगन्नाथ यांची ही 142 वी वार्षिक रथयात्रा आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी लाखो भक्तांच्या समवेत पहाटे सुमारे 4 वाजता जमालपूर येथील जगन्नाथ मंदिरात मंगल आरती केली आहे. या आरतीमध्ये त्यांच्या पत्नी सोनल शाह देखील सहभागी झाल्या होत्या. गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा राज्यातील पहिला दौरा आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये दर वर्षी भव्य रथयात्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये , 19 गजराज, 100 ट्रक, 3 रथ तर 7 कार, 30 मंडळे सहभाग घेतात.