महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुस्लिमांसोबत कुठलाही द्वेष नाही - अमित शाह

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शिवसेनेची बाजू मांडली. शिवसेनेसाठी हा मुद्दा संवेदनशील आहे. मात्र, नव्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेने या विधेयकावर वेगळी भूमिका घेत अमित शाह यांना चांगलेच बोल सुनावले.

Amit Shah
अमित शाह

By

Published : Dec 10, 2019, 12:01 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत आज वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे नेते अमित शाह यांनी उत्तर देत काँग्रेस, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची धर्मनिरपेक्षता अशी आहे की, केरळमध्ये मुस्लिम लीग काँग्रेससोबत आहे तर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आहे, असे म्हणत शहा यांनी काँग्रेसला टोला लगावला. तसेच मुस्लिमांसोबत कोणताही द्वेष नाही, त्यामुळे हे विधेयक येणारच, असा दावाही शाह यांनी केला.

यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शिवसेनेची बाजू मांडली. शिवसेनेसाठी हा मुद्दा संवेदनशील आहे. मात्र, नव्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेने या विधेयकावर वेगळी भूमिका घेत अमित शाह यांना चांगलेच बोल सुनावले.

हे विधेयक योग्य असले तरी त्यामागची अमित शाह यांची भूमिका योग्य नाही. त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच आहे, असे राऊत म्हणाले. नुसते कायदे करून काहीही फायदा होत नाही. तुम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय केले. आत्तापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं, हे पहिले सांगा आणि नवीन विधेयक आणा. ज्या समुदायांच्या लोकांना तुम्ही नागरिकत्व देऊ इच्छिता, असे किती लोक भारतात आहेत? याचे आकडेही तुम्ही देऊ शकला नाहीत, असा टोला राऊत यांनी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details