महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजप २०१४ पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ता स्थापन करेल - अमित शाह - LOKSABHA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये काशीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेथूनच खासदार म्हणून निवडूनही आले. त्यानंतर त्यांनी देशाचा चौफेर विकास केला. आतापर्यंत झालेल्या मतदानावरून असा अंदाज येतोय की, भाजप यावेळी २०१४ पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ता स्थापन करेल.

अमित शाह

By

Published : Apr 24, 2019, 5:21 PM IST


वाराणसी- या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी २०१४ पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर तिन्ही टप्प्यातील मतदान टक्केवारीच्या आधारूवरून त्यांना हा अंदाज व्यक्त केला आहे. तसचे जास्तीत-जास्त जागांवर विजय मिळवून भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते वाराणसीमध्ये भाजपच्या माध्यम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये काशीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेथूनच खासदार म्हणून निवडूनही आले. त्यानंतर त्यांनी देशाचा चौफेर विकास केला. आतापर्यंत झालेल्या मतदानावरून असा अंदाज येतोय की, भाजप यावेळी २०१४ पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ता स्थापन करेल.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याचा प्रश्न विचारला असता, शाह म्हणाले 'देशात लोकशाही आहे. कोण कुठूनही निवडणूक लढवू शकतो. मात्र, आमचा उमेदवार तर आम्ही ठरवलेला आहे. काँग्रेसच सध्या उमेदवारीवरून संभ्रमवस्थेत आहे.

ईव्हीएमवर उपस्थित करण्यात येणाऱ्या शंकेवर ते म्हणाले, गेल्यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीने पराभवानंतर ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, यावेळी पराभवाच्या भितीने निकालापूर्वीच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत असल्याचा टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिलला ११:३० मिनटांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. त्यापूर्वी ते २५ एप्रिलला वाराणसीतील लंका ते दशाशमेध घाटापर्यंत रोड शो करणार असल्याचीही माहिती शाहांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details