नवी दिल्ली - देशामध्ये 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्यापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोनिया गांधींवर पलटवार केला. सध्या देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र, काँग्रेस अत्यंत खालच्या थराचे राजकारण गुंतले आहे, असे टि्वट अमित शाह यांनी केले आहे.
'कोरोना संकटसमयी काँग्रेस खालच्या पातळीचे राजकारण करतंय' - AMIT SHAH
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोनिया गांधींवर पलटवार केला. सध्या देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र, काँग्रेस अत्यंत खालच्या थराचे राजकारण गुंतले आहे, असे टि्वट अमित शाह यांनी केले आहे.
!['कोरोना संकटसमयी काँग्रेस खालच्या पातळीचे राजकारण करतंय' AMIT SHAH HITS OUT SONIA GANDHI](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6641956-303-6641956-1585891210078.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना विषाणूविरूद्धच्या विजयाच्या लढाईत संपूर्ण जग भारताचे कौतुक करीत आहे. कोरोनाचा अंत करण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे आशेने पाहत आहे. कोरोनाविषाणूविरोधात 130 कोटी भारतीय एकत्र आले आहेत. मात्र, या विषम परिस्थितीतही काँग्रेस राजकारण करत आहे, असे टि्वट शाह यांनी केले आहे.
दरम्यान गुरुवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकारी समिती बैठक घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा केली. देशभरामध्ये लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र, हे करताना पूर्वनियोजन करण्यात आले नव्हते. यामुळे संपूर्ण देशभरातील स्थंलातरित कामागारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.