नवी दिल्ली -हिमाचलमध्ये भारतीय जनता पक्षाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने गृहमंत्री अमित शाह यांनी शिमलामध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस विधेयकाविरोधात खोट्या बातम्या पसरवत असून या विधेयकामुळे एखाद्याचे नागरिकत्व जाईल, अशी एक तरी तरतूद राहुल गांधींनी दाखवावी, असे शाह म्हणाले.
पाकिस्तानने नेहरू-लियाकत कराराचे पालन नाही केले. त्यांनी अल्पसंख्याक नागरिकांचा छळ केला. त्यामुळे पाकिस्तानमधून लाखो लोक भारतामध्ये आले आहेत. मात्र त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. त्यामुळे या शरणार्थी लोकांना नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व विधेयक आणले आहे. मात्र काँग्रेस विधेयकाविरोधात खोट्या बातम्या पसरवत आहे, असे शाह म्हणाले.