नवी दिल्ली - केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी शाह त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वराज यांच्या जाण्याने भाजपचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांचे आम्हाला कायम मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अकाली जाण्याने प्रत्येकजण दु:खी आहे. देव त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो, या दु:खातून सावरण्याची शक्ती देव त्यांच्या कुटुंबीयांना देवो, अशा शब्दात त्यांनी स्वराज यांना आदरांजली वाहिली.
सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भाजपचे कधीच न भरुन निघणारे नुकसान - अमित शाह - amit shah condolences swaraj
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्वराज यांना आदरांजली वाहिली.
सुषमा स्वराज
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांची आठवण काढत आहे. सुषमा स्वराज यांनी देशाचे नाव जगभरात उंचावले, असे अमित शाह म्हणाले. दुपारी ३ वाजता लोधी मार्गावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.