चेन्नई - अभिनेता रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची तुलना कृष्ण आणि अर्जुनाशी केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी कृष्ण-अर्जुनासारखी असल्याचे वक्तव्य अभिनेता रजनीकांत यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधीत असणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे रजनीकांत यांनी मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदनही केले.
मोदी-शाह जोडी कृष्ण-अर्जुनासारखी, रजनीकांतने उधळली स्तुतीसुमने - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
अभिनेता रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची तुलना कृष्ण आणि अर्जुनाशी केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी कृष्ण-अर्जुनासारखी असल्याचे वक्तव्य अभिनेता रजनीकांत यांनी केले आहे.
रजनीकांतने मोदी-शाहंवर उधळली स्तुतीसुमने
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात रजनीकांत बोलत होते. यावेळी त्यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तसेच अमित शाह यांना मिशन काश्मीरसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीमधील दहशतवाद संपेल. तसेच जम्मू काश्मीर विकासाच्या दिशेने माग्रक्रमण करेल असेही रजनीकांत म्हणाले.