कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना अजून अवधी असतानाच भारतीय जनता पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा एक दिवसाच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. सकाळी ११ वाजता ते कोलकाता विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर स्टुडंन्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि डाव्या पक्षांनी अमित शाह 'गो बॅक'चे नारे दिले. तसेच काळे झेंडे दाखवून निषेध केला.
शाह यांनी 'राजरहाट न्यूटाऊन एक्शन एरिया तीन' येथे नव्या राष्ट्रीय सुरक्षा गार्ड(एनएसजी) कॅम्पचे उद्धाटन केले. दुपारी अडीच वाजता ते शहिद मीनार परिसरात भाजपतर्फे आयोजित एका कार्यक्रमामध्ये जाणार आहेत. त्यानंतर चार वाजता शाह काली घाट मंदिरात पूजा करणार आहे. यानंतर एका रॅलीचेही आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकता कायद्यावरून लोकांमधील संभ्रम दुर करण्याचा प्रयत्न शाह करणार आहेत. त्यासाठी दोन जनसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच सीएए कायदा पास केल्याबद्दल शाह यांचे अभिनंदन करण्यात येणार आहे.