दिल्लीत वायफाय बरोबर तुमचा मोबाईल चार्ज करायची पण सोय, केजरीवाल-शाह ट्विटर वॉर - दिल्ली निवडणुक २०२०
'फ्री वायफाय'वरून केजरीवाल- शाह यांच्यात "ट्विटर वॉर"
नवी दिल्ली- विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे प्रमाण वाढू लागले आहे. विकास कामांवरून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. दिल्लीतील विकास कामांवरून मुख्यमंत्री अरविंद आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 'ट्विटर वॉर' सुरू झाले आहे.
'फ्री वायफाय'वरून केजरीवाल शाह यांच्यात "ट्विटर वॉर"
दिल्ली भाजप ट्विटरवरून अमित शाह यांचे वक्तव्य ट्विट करण्यात आले होते, 'केजरीवाल तुम्ही म्हणाले होते, संपूर्ण दिल्लीमध्ये मोफत वायफाय देणार, मात्र, मी रस्त्याने वायफाय शोधत आलो, माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. मात्र, मला वायफाय मिळाले नाही, असे ट्विट भाजपने केले होते. या ट्विटला केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर दिले आहे.
'सर आम्ही फ्री वायफाय सोबत फ्री बॅटरी चार्जिंग करण्याची सोयही दिल्लीत केली आहे. दिल्लीमध्ये २०० युनीट वीज मोफत आहे, असे ट्विट करत केजरीवाल यांनी अमित शाह यांना डिचवले.