नवी दिल्ली - कर्नाटकातील महाआघाडीचे सरकार अडचणीत आले असून शनिवारी 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यावर उपाय काढण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या प्रकरणी शनिवारी दिल्लीमध्ये बैठक बोलाविली होती.
कर्नाटकात राजकीय वादळ, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची तातडीची बैठक - Congress
कर्नाटकातील गठबंधन सरकार अडचणीत आले असून शनिवारी 11 आमदारांनी राजीनामा दिले आहेत. यावर उपाय काढण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या प्रकरणी शनिवारी दिल्लीमध्ये बैठक घेतली आहे.
आनंद शर्मा , गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा , अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, ज्योतिरादित्य सिंदिया, जितेंद्र सिंह, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि दिपेंद्र सिंह हुड्डा यांनी शनीवारी बैठकीत सहभाग घेतला.
मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कुमारस्वामी आज अमेरिकेतून परतू शकतात. काँग्रेस, जेडीएसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.