महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन नियंत्रण रेषेवर तणाव कायम; आयटीबीपी, एसएसबीला सतर्कतेचा इशारा - इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस

नियंत्रण रेषेवर भारताने गस्तही वाढविली आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम येथील भारत चीन सीमेवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८० तुकड्या उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यातील नियंत्रण रेषेवर पाठविण्यात आल्या आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 3, 2020, 7:24 PM IST

नवी दिल्ली :भारत-चीन सीमावाद अजूनही मिटलेला नाही. नुकतेच चीनने लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती आणखी संवेदशनशील झाली आहे. भारतीय लष्कर सतर्क झाले असून गृह मंत्रालयानेही आता इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा दलाला (SSB) सतर्कतेचा इशारा दिला असून सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

एसएसबीच्या अनेक तुकड्या अरुणाचल प्रदेश आणि भारत नेपाळ सीमेवर तैनात करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उत्तराखंड आणि सिक्किम येथील नेपाळ-भारत-चीन येथील सीमा भागात घुसखोरी होऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

सिक्कीम राज्यात नेपाळ चीन आणि भारताच्या सीमा एकाच ठिकाणी मिळतात. याआधीही डोकलाम येथे भारत चीन वाद झाला होता. आयटीबीपी, एसएसबी आणि गृह मंत्रालयातील उच्च पदस्थांमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुकड्या सीमेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

नियंत्रण रेषेवर भारताने गस्तही वाढवली आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम येथील भारत चीन सीमेवर जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८० तुकड्या उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यातील नियंत्रण रेषेवर पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, भारतीय लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे गुरुवारी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लेह येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर येथे चीन आणि भारतीय सैन्यात नव्याने वाद झाल्यानंतर लष्करप्रमुख या वादातीत भागाला भेट देत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details