महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्मृती इराणींची माणुसकी, आजारी महिलेला रुग्णवाहिकेमधून पोहोचवले रुग्णालयात - bjp

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना भेटण्यासाठी प्रमोद सावंत दोन दिवस अमेठीच्या दौऱ्यावर आहेत.

रुग्णवाहिकेमधून पोहोचवले रुग्णालयात

By

Published : Jun 23, 2019, 12:03 AM IST

अमेठी- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून एका आजारी महिलेला रुग्णालयात पोहोचवले. या महिलेला चालता येत नव्हते. ती व्हीलचेअरवर बसली होती. स्मृती इराणी यांनी आपली कार थांबवली व त्या आजारी महिलेला रुग्णवाहिकेत बसवले. स्मृती इराणी यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही होते.

येथे कार्यक्रमावेळी एका महिलेने अचानकपणे स्टेजवर येत स्मृती इराणींचे पाय धरले. ही महिला त्यांचे पाय सोडायला तयारच नव्हती, असाही प्रसंग पाहावयास मिळाला. या महिलेने इराणी यांना तिच्या कुटुंबीयांनी तिची जमीन हडप केली असल्याचे सांगितले. ती जमीन परत मिळवून द्यावी, अशी विनंती करत तिने स्मृती यांचे पाय धरले होते. स्मृती यांनी तिची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतरच तिने त्यांचे पाय सोडले.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना भेटण्यासाठी प्रमोद सावंत दोन दिवस अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. स्मृती इराणी आणि प्रमोद सावंत सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत. बारौली गावचे माजी प्रधान राहिलेल्या सुरेंद्र सिंह यांची रहात्या घरी मागच्या महिन्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. ते केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे विश्वासू सहकारी होते. स्मृती इराणी आणि प्रमोद सावंत मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतलेल्या गावांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मनोहर पर्रिकर यांनी सरकारच्या गाव दत्तक योजनेतंर्गत ही गावे दत्तक घेतली आहेत.

'२०१४ साली कार्यकर्ता म्हणून मी अमेठीमध्ये आलो होतो. २० ते २२ दिवस मी सुरेंद्र सिंह यांच्यासोबत काम केले होते. मी त्यांना चांगला ओळखत होतो,' असे प्रमोद सावंत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचार करत असताना पुरब द्वारा गावात आग लागली होती. त्यावेळी स्मृती इराणी आपला ताफा थांबवून लोकांच्या मदतीसाठी गेल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details