वॉशिंग्टन - अमेरिका-चीनदरम्यान तणाव आहे. यातच अमेरिकेन चीनला एक झटका दिला आहे. अमेरिकेन चीनमधील झिंजियांग प्रांतात मुस्लिमांना ताब्यात ठेवल्यावरून चीनच्या आधिकाऱ्यांना व्हिसाप्रतिबंधित केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिकेचा चीनला दणका! मुस्लिमांना ताब्यात ठेवल्यावरून आधिकाऱ्यांना व्हिसा प्रतिबंधित - America ban on travel of chinese
अमेरिका-चीनदरम्यान तणाव आहे. यातच अमेरिकेन चीनला एक दणका दिला आहे.
यापुर्वीदेखील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या दुटप्पी वागण्यावर प्रकाश टाकाला होता. पाकिस्तानला काश्मीरमधील मुस्लिमांविषयी जितकी चिंता आहे. तितकीच चिंता चीनमध्ये नजरकैदेत असलेल्या मुस्लिमांविषयी का नाही, असा प्रश्न अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सचिव अॅलिस वेल्स यांनी पाकिस्तानला विचारला आहे.
चीनने झिजियांग प्रांतामध्ये या अल्पसंख्याक विगर मुस्लीम बंदिवासात ठेवण्यात आले आहे. सुमारे 1 दशलक्ष उईगर आणि इतर मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले गेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चीन या शिबिरांना प्रशिक्षण शिबिरे म्हणून संबोधत असून या शिबिराच्या माध्यमातून ते कट्टरता निर्मूलनाबरोबरच लोकांची कौशल्ये वाढवत असल्याचे सांगत आहे.