महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमेझॉन फ्लेक्स, कुणालाही पार्ट-टाईम काम करत तासाला कमवता येतील १४०/- रुपये - job

अमेझॉन फ्लेक्स योजनेअंतर्गत पार्ट-टाईम डिलीव्हरीद्वारे प्रत्येक तासाला १४०/- रुपये कमावण्याची संधी आहे.

अॅमेझॉन फ्लेक्स योजना

By

Published : Jun 17, 2019, 4:22 PM IST

Updated : Jun 17, 2019, 5:39 PM IST

हैदराबाद- अमेझॉन इंडियाने अमेझॉन फ्लेक्स ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पार्ट-टाईम डिलीव्हरीद्वारे प्रत्येक तासाला १४०/- रुपये कमावण्याची संधी आहे.

अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले, की रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरात आम्ही वस्तूंची डिलिव्हरी जलद करण्याचा प्रयत्न करत आहोत. अमेझॉन फ्लेक्सद्वारे क्षमता वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. या योजनेद्वारे हजारांवर लोकांना याचा फायदा होणार आहे. लोक आता स्वत:च स्वत:चे मालक असणार आहेत. वेळ भेटेल त्यावेळी त्यांना वेळापत्रक बनवून अॅमेझॉन टेक्नॉलॉजीचा वापर करत वस्तूंची डिलिव्हरी करायची आहे.

ज्या लोकांकडे मोटारसायकल किंवा चारचाकी आहे अशांनाच यामध्ये भाग घेता येणार आहे. अमेझॉन फ्लेक्स ही योजना बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथे सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात ही योजना इतर शहरात चालू होणार आहे.

अमेझॉन फ्लेक्स योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी वस्तूंच्या डिलिव्हरींचे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर, त्यांना प्रत्यक्षात वस्तूंची डिलिव्हरी करता येणार आहे.

अमेझॉन फ्लेक्स योजनेत सहभागी होण्याची प्रकिया

अॅन्ड्रॉईड मोबाईलवर प्ले स्टोअरवरुन अमेझॉन फ्लेक्स अॅप डॉउनलोड करा. अॅप डॉउनलोड केल्यानंतर साइन-अप करा. तुमच्याजवळ असलेल्या वाहनाची माहिती द्या.

Last Updated : Jun 17, 2019, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details