नवी दिल्ली - अमेरिकेतील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस भारत भेटीला आले आहे. काल (मंगळवारी) त्यांनी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. यावेळी ते महात्मा गांधींच्या विचारांनी भाराऊन गेले होते. यावेळी त्यांनी भारतीय पोशाख परिधान केला होता.
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली - जेफ बेझोस भारत भेट
अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस भारत भेटीला आले आहे. काल (मंगळवारी) त्यांनी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली.
मेझॉनचे सीईओ जेफ बेझोस
'ज्यांनी खऱ्या अर्थाने जग बदलले त्या महात्मा गांधींना आज आदरांजली वाहिली, असे ट्विट करत त्यांनी महात्मा गांधींचा एका सुविचारही पोस्ट केला आहे. 'जगा असे की तुमचा उद्या मृत्यू होणार आहे, मात्र, शिका असे जसे की तुम्ही अनंत काळ जगणार आहात, असा महात्मा गांधींचा सुविचार बेझोस यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Last Updated : Jan 15, 2020, 1:05 PM IST