महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाशी लढा... फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवायला सांगतोय अलवरच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा रोबो - corona updates news

लॉकडाऊन काळात नागरिक घरात बंदिस्त होते. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काहीतर नवीन उपकरण तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यावर पहिल्यांदा संशोधन केले आणि २ उपकरणे बनवली. यामध्ये एक टोपी तयार केली आहे, जी तुम्हाला फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवण्यास मदत करते. तर दुसरा रोबो जो तुम्हाला वेळोवेळी हात धुण्याची सुचना करत राहिल. या माध्यमातून कोरोनासारख्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास नागरिकांना मदत होईल असा त्याचा दावा आहे.

Robot for maintain social distance
रोबा आणि कॅप

By

Published : Jun 8, 2020, 9:24 AM IST

अलवर- देशात सध्या कोरोना महामारी वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या पार्दुभावापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सर्वच स्तरातून करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या अलवर येथील एका १५ वर्षीय मुलाने फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येईल अशी एक टोपी आणि हात धुण्याची निर्धारित वेळ सांगणार रोबोट तयार केला आहे.

अलवर शहरातील सेक्टर २ मध्ये राहणाऱ्या या १५ वर्षीय मुलाचे नाव कुणाल आहे. कोरोना महामारीच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगचे महत्व ओळखून त्याने ही उपकरणे निर्माण केली आहेत. त्याने ही दोन्ही उपकरणे कंप्यूटर प्रोग्रामिंगच्या सहाय्याने तयार केली आहेत. कुणाल नेहमीच अशा प्रकारची उपकरणे निर्माण करत राहतो. यापूर्वीही त्याने गवत कापण्याची सौरउर्जेवरील मशीन बनवली होती. त्यासाठी त्याला विज्ञान प्रदर्शानामध्ये पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्याने अनेक प्रकारचे इलेक्ट्रीक रोबो घरातच तयार केले आहेत.

कोरोनाशी लढा... फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवायला सांगतोय अलवरच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा रोबो

कुणाल म्हणाला, की या लॉकडाऊन काळात नागरिक घरात बंदिस्त होतो. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काहीतर नवीन उपकरण तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यावर पहिल्यांदा संशोधन केले आणि २ उपकरणे बनवली. यामध्ये एक टोपी तयार केली आहे, जी तुम्हाला फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवण्यास मदत करते. तर दुसरा रोबो जो तुम्हाला वेळोवेळी हात धुण्याची सुचना करत राहिल. या माध्यमातून कोरोनासारख्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास नागरिकांना मदत होईल असा त्याचा दावा आहे.

कुणाल सांगतो या कामातून त्याला खूप आनंद मिळतो. विशेष म्हणजे काही तासातच तो अशा प्रकारची उपकरणे तयार करतो. कुणालला लहानपणापासूनच अशा प्रकारची उपकरणे निर्माण करण्याचा छंद जडला आहे. कुणाल उपलब्ध साधनांच्या सहाय्याने अशा प्रकारची वैज्ञानिक उपकरणे तयार करत असतो. तो कंम्यूटर आणि त्याच्या वरिष्ठां मार्गदर्शनाच्या मदतीने, अशा प्रकारची नवनवीन उपकरणे तयार करत असल्याचे कुणालने सांगितले. त्याला इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्याला देशासाठी काही तर वेगळं करून दाखवायचे आहे.

कुणालचे वडील हयात नाहीत. घरात एक लहान बहीण आणि आई आहे. त्यांना मदत करणारा दुसरी कोणी व्यक्ती नाही. मात्र, कुणाल स्वत: अशा प्रकारची उपकरणे तयार करत राहतो.

ABOUT THE AUTHOR

...view details