महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पहलू खानसह त्याची २ मुले गोवंश तस्कर; न्यायालयात आरोपपत्र दाखल - तस्करी

डेअरी चालक असलेले पहलू खान आणि त्याची २ मुले राजस्थानमधून गाय खरेदी करुन हरियाणाला जात होते. परंतु, १ एप्रिल २०१७ रोजी गोरक्षकाच्या जमावाने गोवंश तस्करीच्या नावाखाली पहलू खान आणि त्याच्या २ मुलांना मारहाण केली होती.

पहलू खान आणि त्यांची २ मुले

By

Published : Jun 29, 2019, 4:41 PM IST

नवी दिल्ली - राजस्थानमधील दिल्ली-अलवर महामार्गावर २ वर्षांपूर्वी पहलू खान आणि त्याच्या २ मुलांचा गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पहलू खान याच्याविरोधात गोवंश तस्करीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या पिकअप वाहनाचाही समावेश करण्यात आला आहे.

डेअरी चालक असलेले पहलू खान आणि त्याची २ मुले राजस्थानमधून गाय खरेदी करुन हरियाणाला जात होते. परंतु, १ एप्रिल २०१७ रोजी गोरक्षकाच्या जमावाने गोवंश तस्करीच्या नावाखाली पहलू खान आणि त्याच्या २ मुलांना मारहाण केली. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या पहलू खान यांचा २ दिवसानंतर मृत्यू झाला होता. या घटनेनंतर, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पहलु खान याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ

परंतु, मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात पहलू खान आणि त्याच्या २ मुलांवर गोवंश तस्करीचा आरोप लावण्यात आला होता. पोलिसांनी पहलू खानची मुले इरशाद (२५) आणि अरिफ (२२) यांना राजस्थान प्राणी कायदा १९९५ अंतर्गत कलम ५,८ आणि ९ नुसार दोषी ठरवले आहे. यासंबंधी काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर ३० डिसेंबरला आरोपपत्र तयार करण्यात आले होती. आरोपपत्र २९ मे रोजी बहरोड येथील न्यायालयात सादर करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी ६ आरोपींना मोबाईल, कॉल रेकॉर्डिंग आणि व्यापाऱ्यांचा जबाब तपासून क्लिन चीट दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details