महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अलाहाबादच्या न्यायाधीशांचे पंतप्रधान मोदींना पत्र; न्यायव्यवस्थेतील घराणेशाहीवर उपस्थित केले प्रश्न

अलाहाबादचे न्यायाधीश रंगनाथ पांडे यांनी न्यायव्यवस्थेतील घराणेशाही आणि जातीवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

By

Published : Jul 3, 2019, 12:55 PM IST

अलाहाबादच्या न्यायाधीशाचे पीएम मोदींना पत्र

नवी दिल्ली - अलाहाबादचे न्यायाधीश रंगनाथ पांडे यांनी न्यायव्यवस्थेतील घराणेशाही आणि जातीवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पांडेय यांनी मोदींचे प्रथम अभिनंदन केले आहे. 'तुमच लक्ष्य हे सरळ आणि स्पष्ट असेल तर कठोर प्रयत्न केल्यावर विजय तुमचाच होतो, हे तुमच्या निवडणुकीतील विजयानंतर स्पष्ट झाले आहे. याचबरोबर तुमच्या विजयानंतर राजकीय क्षेत्रातील घराणेशाही संपत आली आहे' असे त्यांनी पत्रात सुरवातीला म्हटले आहे.

अलाहाबादच्या न्यायाधीशाचे पीएम मोदींना पत्र


'न्यायाधीश म्हणून माझ्या 34 वर्षाच्या कारकीर्दीत मी न्याय व्यवस्थेतील ज्या चुका पाहिल्या आहेत. त्याच तुमच्या समोर मांडण्यासाठी मी हे पत्र लिहले आहे', असे पांडेय यांनी म्हटले आहे.


'लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायव्यवस्था हा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. मात्र सध्या न्याय व्यवस्थेत जातीवाद आणि घराणेशाही मोठ्या प्रमाणात पसरलेली पाहायला मिळत आहे', असे न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करताना घराणेशाही आणि जातीवाद केला जातो असा आरोप आपल्या पत्राद्वारे केला आहे.


राजकीय नेत्याची निवड लोकांद्वारे केली जाते. तर शासकीय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. कठीण कसोटीमधून उतरावे लागते. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी कोणताही मापदंड नाही, असे न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी पत्रात लिहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details