भोपाळ- केंद्रातील भाजप सरकारमध्ये जे लोक आहेत ते संघाच्या विचारसरणीचे आहेत. ज्यांनी 2014 नंतर सत्तेत आल्यापासून आतापर्यंत सर्व कामगार विरोधी धोरणे राबवली आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली आहे.
संघ विचारधारेच्या केंद्र सरकारचे 2014 पासूनचे निर्णय कामगार विरोधी- दिग्विजय सिंह
सिंह रविवार केंद्रीय श्रम संगठनेचा 'सत्याग्रह' या आपल्या भाषणात ते बोलत होते. सिंह पुढे म्हणाले, देशात पहिल्यांदाच संघाच्या विचारधारेचे लोक सत्तेत बसले आहेत. 2014 पासून त्यांनी जे निर्णय घेतले ते सर्व कामगार विरोधी आहेत.
सिंह यांनी रविवार केंद्रीय श्रम संगठनेचा 'सत्याग्रह' या आपल्या भाषणात ते बोलत होते. सिंह पुढे म्हणाले, देशात पहिल्यांदाच संघाच्या विचारधारेचे लोक सत्तेत बसले आहेत. 2014 पासून त्यांनी जे निर्णय घेतले ते सर्व कामगार विरोधी आहेत.
तसेच केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्राला तोडण्याचे काम करत आहे. ज्यामुळे हे दाखवले जाईल की सार्वजनिक क्षेत्रात सध्या तांत्रिक क्षमता नाही असे बिंबवून या सार्वजनिक क्षेत्राला खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा ही त्यांनी केला.