नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे २१ तारेखच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २२ तारखेच्या रात्री १० पर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत.
कोरोनाची दहशत : देशभरात रेल्वेचा 'मेगाब्लॉक'... तब्बल २२ तास रेल्वे सेवा होणार खंडित - trains shall not run
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे २१ तारेखच्या मध्य रात्री १२ वाजल्यापासून ते २२ तारखेच्या रात्री १० पर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत.
कोरोनाच्या भीतीमुळे देशभरातीतल जनजीवन विस्कळीत झाले आहे. कमी प्रवासी संख्येमुळे रेल्वे विभागाने देशभरातील तब्बल १६८ गाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. मात्र, आता कोरोनाच्या भीतामुळे प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण देशात वाढतच आहेत. त्यामुळे नागरिक प्रवास टाळत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका रेल्वेच्या उत्पन्नालाही बसणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये जवळजवळ महिनाभर आधीची रेल्वे तिकिटे आरक्षित असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने नागरिक प्रवास टाळत आहेत.