नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याबाबतची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्व आरोपींनी एकाचवेळी फाशी देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, आता या निर्णयाविरोधात केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सर्व दोषींनी कायदेशीर मार्गांचा वापर करण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला आहे.
सात दिवसांनी कायदेशीर पर्याय संपल्यानंतर दोषींना फाशी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. दोषी विविध कायदेशीर पर्यायांचा वापर करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत २ वेळा डेथ वॉरंट टळला आहे.