नवी दिल्ली -देशामध्ये कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू आहे. 14 तारखेला लॉकडाऊन संपल्यानंतरही पुढे सुरुच राहणार असल्याचे दिसून येत आहे. या काळात सर्व देशवासीय घरांमध्ये अडकून पडले आहेत. नागरिकांना विनाअडथळा केबल, डीटीएचची सेवा मिळावी म्हणून ग्राहकांशी सहकार्य करा, असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल, डीटीएच प्रोव्हायडर्सना केले आहे.
ग्राहकांना विनाअडथळा सेवा पुरवा; केबल, डीटीएच प्रोव्हायडर्सना सरकारच्या सूचना - कोरोना संचारबंदी
ग्राहकांना विनाअडथळा सेवा मिळावी, म्हणून या कंपण्यांनी इतर भागधारांशीही सहकार्य करावे, अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केबल, डीटीएच प्रोव्हायडर्सना केल्या आहेत.
ग्राहकांना विनाअडथळा सेवा मिळावी, म्हणून या कंपण्यांनी इतर भागधारांशीही सहकार्य करावे, अशा सुचना दिल्या आहेत. नागरिक घरांमध्ये बसून कंटाळले आहेत. अशात जर टीव्हीही बंद झाला, तर नागरिकांचे मनोरंजनाचे साधन बंद होईल, त्यामुळे या सुचना दिल्या आहेत.
देशभरामध्ये 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आता देशातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुशे संचारबंदी वाढणार आहे. अनेक राज्यांनी संचारबंदी वाढविण्याची विनंती पंतप्रधान मोदींना केली आहे. पंजाब आणि आडिशा राज्याने आधीच संचारबंदी वाढविली आहे.