दहशतवाद्यांचा नेपाळमार्गे भारतात प्रवेश; सीमेवर हाय अलर्ट - INDIA NEPAL BORDER
आंतरराष्ट्रीय संघटना इस्लामिक स्टेट दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय संघटना इस्लामिक स्टेट दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. दहशतवादी भारत-नेपाळ सीमेवरील कोणत्याही जिल्ह्यातून नेपाळमधून पलायन करू शकतात. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे दोघांना अंतिम वेळी पाहण्यात आले होते. अब्दुल समद व इलियास हे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून दोघेही आयएसशी संबंधित आहेत.
नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगरसह नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच संपूर्ण गोरखपूर झोनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे पोलीस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांनी सांगितले.