महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दारूचे व्यसन आणि दारूमुक्ती दोन्ही मेंदूतील बदलांना ठरतात कारणीभूत..

दारूचे व्यसन करणे तसेच दारू सोडणे या दोन्ही प्रक्रियांनंतर मेंदूमध्ये मोठे बदल घडत असतात. या परिवर्तनाचा प्रभाव मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो. पीएनएएस या ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात संबंधित बाब समोर आली आहे.

By

Published : Jan 15, 2020, 3:42 PM IST

liquor addiction news
दारूचे व्यसन करणे तसेच दारू सोडणे या दोन्ही प्रक्रियांनंतर मेंदूमध्ये मोठे बदल घडत असतात.

वॉशिंग्टन (डी.सी.) - दारूचे व्यसन असणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. तसेच अनेकदा व्यसनमुक्ती केलेल्या व्यक्ती देखील आपल्या ऐकीवात असतात.


परंतु, दारूचे व्यसन करणे तसेच दारू सोडणे या दोन्ही प्रक्रियांनंतर मेंदूमध्ये मोठे बदल घडत असतात. या परिवर्तनाचा प्रभाव मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो. पीएनएएस या ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात संबंधित बाब समोर आली आहे.

मेंदूच्या याआधी न तपासण्यात आलेल्या भागांना अभ्यासण्यात आले. यामध्ये दारूवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. याआधीही न्युरोलॉजीमध्ये दारूच्या व्यसनाने प्रभावित असलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला होता. परंतु, याची क्षमता कायम मर्यादित भागावरच केंद्रीत करण्यात आली होती, असे संशोधक-प्राध्यापक ऑलिव्हीयर जॉर्ज यांनी सांगितले.

संशोधकांमध्ये अनेक वर्षांपासून काही गोष्टींमध्ये विवाद आहेत. व्यसन लागण्यासाठी ब्रेन सर्किट कारणीभूत असल्याचे संशोधक सांगत होते. परंतु, या संशोधनाच्या अनुमानातून नवीन तथ्य समोर आले आहे. ज्यामध्ये मेंदूच्या संपूर्ण भाग प्रभावित असल्याचे समोर आले आहे. दारूचे व्यसन जडण्यामागील कल्पना तसेच याबाबात समोर येणाऱ्या परिस्थितीबद्दलही अनेक गोष्टींचा उलगडा यानिमित्ताने झाला आहे. यामागील मानसशास्त्रीय संकल्पना तसेच अन्य कारणे अधोरेखित करण्यात आली आहेत.

या प्रकारचे 'ब्रेन रिमॉडेलींग' सर्वसामान्य व्यक्तींच्या मेंदूत आढळत नाही. तसेच मौज-मजेसाठी मद्यपान करणाऱ्यांमध्येही या प्रक्रिया नसतात. परंतु, दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे ब्रेन रिमॉडेलींग आढल्याचे संशोधक जॉर्ज यांनी सांगितले. यामुळे मेंदूच्या परिवर्तन क्षमतेवर परिणाम होऊन गंभीर विकार संभवण्याचा धोका असतो, असे त्यांनी नमूद केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details