महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: घटस्फोटासाठी अक्षय कुमारच्या पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घेतली धाव - nirbhaya convict wife filed divorse

अक्षयच्या पत्नीने न्यायालायत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून माझ्या पतीला फाशी होणार आहे, म्हणून मला त्याची विधवा होऊन जगायचे नाही, असे तिने याचिकेत नमूद केले आहे. यावर न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १९ मार्च पर्यंत लांबविली आहे.

aurangabad bihar
कौटुंबिक न्यायालय औरंगाबाद

By

Published : Mar 17, 2020, 9:27 PM IST

औरंगाबाद (बिहार)- निर्भया अत्याचारातील आरोपी अक्षय कुमार याची पत्नी पुनिता हिने घटस्फोटासाठी औरंगाबाद येथील कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. अक्षयच्या पत्नीने न्यायालायत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून माझ्या पतीला फाशी होणार आहे, म्हणून मला त्याची विधवा होऊन जगायचे नाही, असे याचिकेत नमूद केले आहे. यावर न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १९ मार्चपर्यंत लांबविली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हिंदू विवाह कायद्यानुसार पतीने जर बलात्कार व गैरकृत्य केले आणि या गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला, तर हिंदू विवाह कायद्यांतर्गत येणाऱ्या विविध कल्मान्वये पत्नीला घटस्फोट मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, मी पुनितातर्फे कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखले केली आहे, असे वकील मुकेश कुमार सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, निर्भया अत्याचाराप्रकरणी ५ मार्च रोजी ट्रायल कोर्टाने नवीन 'डेथ वॉरंट' काढले होते. त्यानुसार आरोपी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार या चौघा आरोपींना २० मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता फाशी दिली जाणार आहे. फाशीच्या शिक्षेपासून बचावाकरिता अनके युक्त्या वापरल्या, मात्र त्या निकामी झाल्यात. सुटकेसाठी आरोपींनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि भारतीय मानवाधिकार आयोगातही धाव घेतली होती. मात्र, आता आरोपींसमोर बचावासाठी कुठलाही पर्याय उरला नसल्याने शिक्षा देण्यास उशीर होणार नाही, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-मध्यप्रदेश सत्तापेच : आम्हाला कैद केलेले नाही.. सिंधियांसोबत राहण्याचा बंडखोर आमदारांचा निर्धार

ABOUT THE AUTHOR

...view details