नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात पेटवून दिलेल्या पीडितेची अखेर मृत्यूशी झुंज संपली. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. त्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ईतर नेते दिल्ली विधानभवनासमोर धरणे प्रदर्शन करत आहेत.
हैदराबाद घटनेनंतर देशामध्ये संताप उसळला होता. त्यानंतर पुन्हा उन्नावमध्ये तीच घटना घडली आहे. पीडित मुलीची जिवंत राहण्याची इच्छा होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. एक मुलगी न्याय मागत होती. तो आम्ही तीला देऊ शकलो नाही. हा आमच्यासाठी एक काळा दिवस आहे, असे अखिलेश यादव म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारच्या राजवटीतली ही पहिली घटना नाही. यापुर्वी एका पीडितीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या मुलीने आपला पुर्ण कुटुंब गमावले. याप्रकरणामध्ये भाजपाचा दोष होता, अशी टीका अखिलेश यांनी केली.