लखनऊ(उत्तर प्रदेश): समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिवाळीत इटावा जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी भविष्यात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींमध्ये छोट्या स्थानिक पक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले.
दिवाळीनिमित्त अखिलेश यादव इटाव्यात आहेत. मुलायमसिंह यादव यांच्या बंगल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठ्या पक्षांशी आघाडी करण्यापेक्षा येणाऱ्या काळात छोट्या पक्षांसोबत युती करणार असल्याचे सांगितले. यामध्ये प्रगतशील समाजवादी पार्टीचा देखील समावेश असेल, असे ते म्हणाले.
2022 च्या निवडणुकीत 'पीएसपी'सोबत आघाडी... मोठ्या पक्षांसोबत जाण्यात नकार भाजपाने दिला बिहारी जनतेला धोका
भाजपाने बिहारी जनतेसोबत धोका केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणुकांच्या निकालात धोका झाल्याचे ते म्हणाले. याला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप अखिलेश यांनी केलाय. मतमोजणीदरम्यान विजयी झाल्याचे प्रमाणपत्र काहींना देण्यात आले. तर, जिंकलं कोणी वेगळचं होतं, असे अखिलेश म्हणाले.
शेतकऱ्याची परिस्थिती खालावली
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर अखिलेश यांनी हल्ला चढवला. शहरातील रस्त्यांवर अद्याप शौचालयं बनवलेली नाहीत. मात्र त्यावर मोठा निधी खर्च केल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या बाबतीतही हे सरकार उदासीन असल्याचे ते म्हणाले.