लखनऊ : हिंदू साधू-संतांची सर्वोच्च संस्था असलेल्या 'अखिल भारतीय आखाडा परिषदे'ने वाढलेल्या कोरोना लॉकडाऊनला पाठिंबा घोषित केला. अखिल भारतीय अखा़डा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी १३ अखाड्यांतील साधू-संतांना कोरोना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले. संचारबंदीचे नियम पाळून स्वत:चे आणि समाजाचे कोरोनापासून रक्षण करण्याचे आवाहनही महंत गिरी यांनी केले.
वाढलेल्या लॉकडाऊनला अखिल भारतीय आखाडा परिषदेचा पाठिंबा - महंत नरेंद्र गीरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली. 'अखिल भारतीय आखाडा परिषदे'ने वाढलेल्या कोरोना लॉकडाऊनला पाठिंबा घोषित केला. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी १३ अखाड्यांतील साधू-संतांना कोरोना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली. सर्व साधूंनी पंतप्रधानांच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय असून त्याचे सर्वांनी पालन करावे, असे महंत गिरी यांनी सांगितले.
आखाड्यातील प्रत्येकाने आपापल्यापरिने पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला मदत करावी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना संकटाच्या काळात खुप चांगले काम करत आहेत. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेची काळजी घेत आहेत, असे महंत गिरी म्हणाले.