नवी दिल्ली- ऑल इंडिया रेडिओचे मुख्यालय आकाशवाणी भवन गुरूवारी सॅनिटाईझ करण्यात आले. २७ एप्रिलला कार्यालयात आलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने कार्यालय सॅनिटाईझ केले गेले.
त्या कर्मचाऱ्याला ११ मे ला प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १३ मे रोजी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती ऑल इंडिया रेडिओच्या एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.