पाटणा- बिहारमधील अपक्ष आमदार अनंत सिंह यांच्या घरुन पोलिसांनी एके-47 जप्त केली आहे. विशेष म्हणजे एके-47 सोबतच पोलिसांना बॉम्ब सदृश वस्तू आढळल्या आहेत. सिंह यांच्या घरी मोठा शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एसपी कान्तेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हा छापा टाकला आहे. यावेळी अनंत सिंह यांच्या घराभोवती मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच दहशतवादी विरोधी पथक आणि स्पेशल टास्क फोर्स पथकाला पाचारण करण्यात आले होते.
बिहारमधील आमदाराच्या घरी सापडली AK-47; बॉम्ब सदृश वस्तूही आढळल्या - bihar news
बिहारमधील अपक्ष आमदार अनंत सिंह यांच्या घरुन पोलिसांनी एके-47 जप्त केली आहे. सिंह यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची राहिली आहे. ते राजकारणात येण्यापूर्वी गॅगस्टर होते.
आमदाराच्या घरी एके-47 सापडली असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनंत सिंह यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची राहिली आहे. ते राजकारणात येण्यापूर्वी गॅगस्टर होते. तसेच ते नितीश कुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आहेत. 2004 सालीही एटीएसने सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी अनंत सिंह यांना लागली होती. याशिवाय त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
बिहारमध्ये यापूर्वीही एके-47 सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. बिहारच्या विविध जिल्ह्यात केलेल्या छापेमारीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एके-47 जप्त केल्या आहेत. त्यामुळे अनंत सिंह आणि बिहारमध्ये सापडलेल्या एके-47 यांचा काही संबंध आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.