महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगड लोकसभा निवडणूक : अजित जोगींची माघार, बसप सर्व जागा लढवणार - loksabha election

छत्तीसगड राज्य निर्मितीनंतर आतापर्यंत जोगींच्या पक्षाकडून कोणी लढले नाही, असे झालेले नाही.

छत्तीसगड जनता काँग्रेसचे (सीजेसी) प्रमुख अजित जोगी

By

Published : Mar 22, 2019, 7:58 PM IST

रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि छत्तीसगड जनता काँग्रेसचे (सीजेसी) प्रमुख अजित जोगी यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी जोगी आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीपासून लांब ठेवण्याच्या विचारात आहेत. यामुळे छत्तीसगड लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत राहणार आहे.

जोगींनी २००५ मध्ये काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. राज्यामध्ये जोगींचा दबदबा आहे. छत्तीसगड राज्य निर्मितीनंतर आतापर्यंत जोगींच्या पक्षाकडून कोणी लढले नाही, असे झालेले नाही.

माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पर्याप्त संसाधने नाहीत. मी कोरबातून निवडणूक लढवावी, असे लोकांचे मत आहे. मात्र, मी याबाबतीत काहीच ठरविले नाही, असे जोगींनी बोलताना सांगितले. माझे लक्ष सध्या पक्ष मजबुतीवर असल्याचेही जोगींनी सांगितले. जोगी बसपसाठी प्रचार करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details