रायपूर -छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि जनता काँग्रेस छत्तीसगडचे सर्वेसर्वा अजित जोगी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रायपूरच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ आहेत. आज त्यांची त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
अजित जोगी हे छत्तीसगडचे प्रथम मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेश पुनर्गठन अधिनियम २००० अंतर्गत १ नोव्हेंबरला २००० ला मध्यप्रदेशातून विलग होऊन छत्तीसगड राज्य अस्तित्वात आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणूकांमध्ये अजित जोगी काँग्रेस पक्षातून निवडणून आले होते.
पेशाने इंजिनिअर आहेत जोगी -
अजित जोगी हे पेशाने इंजिनिअर आहेत. त्यांना अभियांत्रिकीमध्ये भोपाळ विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकावले होते. तर, एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवताना भारतीय पोलीस अधिकारी (आयपीएस) म्हणून निवड झाली होती. छत्तीसगडमध्ये सिरसा समुदायाचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. ज्याच्या बळावर त्यांनी मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
मागच्या वर्षी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बसपशी आघाडी केली होती. त्यामध्ये त्यांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. मात्र, छत्तिसगडच्या राजकारणात त्यांनी आपली छाप सोडली होती. सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.