महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाराणसीत मोदींविरुद्ध प्रियांका लढत नाहीच, काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी जाहीर - loksabha polls 2019

प्रियांका गांधी मोदींना लढत देऊ शकतील का, याविषयी प्रियांका यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशानंतर उत्सुकता होती. अजय राय हे उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांची वाराणसीत चांगली पकड असून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती.

वाराणसी

By

Published : Apr 25, 2019, 1:04 PM IST

Updated : Apr 25, 2019, 2:30 PM IST

नवी दिल्ली - आज काँग्रेसने वाराणसी आणि गोरखपूरमधील उमेदवारांची घोषणा केली. वाराणसीतून अजय राय तर, गोरखपूरमधून मधूसूदन तिवारी काँग्रेसकडून लढणार आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला तर, गोरखपूर हा योगींचा गड बनला आहे. अशा स्थितीत काँग्रेस वाराणसीत मोदींविरोधात प्रियांका कार्ड चालवणार काय, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

वाराणसी


प्रियांका गांधी मोदींना लढत देऊ शकतील का, याविषयी प्रियांका यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशानंतर उत्सुकता होती. मात्र, वाराणसीतून अजय राय यांना काँग्रेसचे तिकिट देण्यात आले आहे. राय हे उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांची वाराणसीत चांगली पकड असून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती.

Last Updated : Apr 25, 2019, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details