नवी दिल्ली - देशात सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे. आजपासून एअर इंडियाने देशांतर्गत उड्डाणांसाठी बुकिंग सुरू केले आहे. एअर इंडियाने टि्वट करून ही माहिती दिली आहे. येत्या 25 मे पासून देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहेत.
देशांतर्गत उड्डाणांसाठी तिकिट बुकिंग सुरू झाले आहे. आज दुपारी 12.30 पासून देशांतर्गत उड्डाणांसाठी तिकिट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. एअर इंडियाचे तिकिट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन तिकिट बुक करावे, किंवा ट्रॅव्हल एजंटद्वारे करता येईल. तिकिट बुकिंगविषयी अधिक माहिती ग्राहक सेवांद्वारे देण्यात येत आहे, असे टि्वट एअर इंडियाने केले आहे.