नवी दिल्ली -चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान काल (शुक्रवार) दिल्लीहून वुहानला गेले होते. यावेळी ३२४ भारतीयांना एअरलिफ्ट करुन हे विमान आज सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे.
थोड्याच वेळात या सर्व लोकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तसेच डॉक्टरांचे एक विशेष पथक या सर्वांची तपासणी करणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास या सर्वांना निरिक्षणाखालीदेखील ठेवण्यात येणार आहे.