नोएडा (उत्तर प्रदेश) - कोरोना विषाणू फैलावाच्या घटना चारही बाजूंनी ऐकायला मिळत आहेत. यातच ग्रेटर नोएडामधील एक गाव एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे. येथील अगहपूर या गावातील एका कॅप्टनने संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. राजेश कुमार गुर्जर असे या कॅप्टनचे नाव आहे. वैमानिक राजेश कुमार एअर इंडिया मध्ये कार्यरत आहेत.
कोरोनाच्या तडाख्यातही सोवा चोख बजावणारे एअर इंडियाचे सैनिक भारतामध्ये सध्या अनेक परदेशी लोक अडकून पडले आहेत. देशात लॉकडाऊन झाल्यामुळे सध्या कोणतीही प्रवासी वाहने उपलब्ध नाहीत. विमानसेवाही बंद आहे. दरम्यान, या परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पोहोचवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानंतर काही विशेष विमाने विविध देशांकडे पाठवण्यात आली. पण विमानांसाठी वैमानिक आवश्यक होते. बहुतेक वैमानिक विषाणू संसर्गाचा धोका असल्याने आपली सेवा देण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत राजेश कुमार यांनी ब्रिटिश पर्यटक आणि नागरिकांना लंडनला घेऊन जाण्याची तयारी दर्शवली त्यांनी सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पोहोचवले.
कोरोनाच्या तडाख्यातही सोवा चोख बजावणारे एअर इंडियाचे सैनिक सध्या इंग्लंडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मृत्यूही झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना घेऊन लंडनला जाणे हे अत्यंत जोखमीचे काम होते. तरीही परदेशी नागरिकांना मायदेशी पोहोचवणे ही आपली जबाबदारी मानून ती व्यवस्थितपणे पार पडल्यामुळे सध्या त्यांचे नाव कौतुकाने घेतले जात आहे.
पायलट राजेश यांनी एअर इंडियाचे विमान 161-162 घेऊन 13 एप्रिलच्या रात्री 2:30 वाजता लंडनच्या दिशेने उड्डाण केले. हे विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता लंडनला पोहोचले. यानंतर राजेश यांनी तेथील प्रतीक्षालयात काही वेळ विश्रांती घेतली. पुन्हा विमानात इंधन भरून ते मायदेशी परतले. लंडनला जाऊन परत येण्याचा हा तब्बल 17 तासांचा प्रवास होता. मात्र, त्यांनी फार वेळ आराम न करता ही दोन्ही उड्डाणे लागोपाठ करत आपले मिशन सफल केले.
प्रथम अमृतसरहून लंडनला जाणारे 230 प्रवासी त्यांनी विमानात घेतले. यानंतर दिल्लीतून 70 प्रवाशांनाही घेतले. त्यांच्यासह राजेश यांच्या विमानाने लंडनच्या दिशेने उड्डाण केले. कोरोनाचा भयंकर धोका असतानाही या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या मायदेशी पोहोचवल्याबद्दल राजेश यांचे मोठे कौतुक होत आहे.